देवाची आभाळमाया
देवाची आभाळमाया
देवा तू निर्मिले
अवघे ब्रम्हांड
पृथ्वी सूर्य चंद्र
आभाळमायाची (1)
सुंदर आकाशी
चांदण्यांच्या राशी
तारे स्वयंप्रकाशी
आभाळमायाची (2)
वृक्ष तरु लता
वेली बहरता
फळे फुले येता
आभाळमायाची (3)
सागर सरिता
मीलन घडता
कर्ता करविता
आभाळमायाची (4)
ग्रह नक्षत्रांचे
देणे सामर्थ्याचे
प्रेमळ प्रभूचे
आभाळमायाची (5)
निळ्या नभांगणी
चंद्र तारांगणी
नक्षत्र रोहिणी
आभाळमायाची (6)