आणी बाणी
आणी बाणी


दिवस रात्र कष्ट करतो
घरातला कर्ता तो बाप असतो
देव त्याच्यावर आणीबाणी का ? आणतो....?
लहानाच मोठं पै पैं जमवतो
काही कमी पडायला नको म्हणतो
देव त्याच्यावर घरावर आणीबाणी का? आणतो....?
स्वतः साठी काही घेतं नसतो
मुलाचं भविष्य घडवण्यासाठी
खूप स्वप्न पहात असतो
देव त्याच्यावर संकटाची आणीबाणी का? आणतो...?
उद्या येणार माझ म्हातारपण
मुलाबाळांच्या नातवात घालवायचं
असच आयुष्य जगत राहायचं
अशी अशा मनी ठरवतो
देव त्याच्यावर आजा राची आणीबाणी का? आणतो....!
सरळ मार्गाने वाटचाल धरतो
अनेक प्रसगांतून सं गळ सहन करत
आलेला असतो त्यावर अन्याय होतो
देव त्याच्यावर आणीबाणी का ? आणतो.....?