STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

शीर्षक मी आहे ना !!

शीर्षक मी आहे ना !!

1 min
323

पैलतीर दिसू लागलाय 

हातपाय लागलेत थरथरु

आई-बाबा मी आहे ना!!

नका हो तुम्ही घाबरु   (1)


वृद्धाश्रमात टाकायचे

दादा - वहिनींनी ठरवले

पण मीच आडवी आले

तुम्हांला घरी घेऊन आले  (2) 


तयार नव्हतात तुम्ही

माझ्या घरी यायला

मुलगा - मुलगी समान

दादा मोठ्याने गरजला   (3)


गोड बोलून तुमच्याकडून

फ्लॅट घेतला स्वतःला 

तुला हवंय का काही !!

मानभावीपणे बोलला    (4)


आई - वडील हवेत मला

नको पैसा सोने - नाणे

जिवाभावाची ठेव माझी

जपीन मी प्राणपणाने    (5)


वाईट अशाचे वाटते रे

असा कसा तू झालास ?

छोटेपणी मला समजवणारा

इतका कसा बदललास?  (6)


सृष्टीचक्रच आहे हे

बदल स्थायीभाव

मुलीचे घरही हक्काचे

नको परका भाव     (7)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract