STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Abstract

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Abstract

जीवनसत्य

जीवनसत्य

1 min
231

लग्न लग्न म्हणजे आहे तरी काय

धावणार्‍या रथाचे दोन पाय 


हात हातात घेउन हाकायची ती गाडी 

दुःखात मात्र क्षणात होतो राडा रडारडी 


एकाच्या जाण्याने संपूर्ण आयुष्याची होते पडझड 

बावरलेल्या वेड्या मनाला विरह तो होत नाही सहन 


सुखदुःखाच्या आठवणीने भरलेले असते मन 

खास नको वाटतो देवा आता एकट्याचा प्रवास 


सरळ असलेला रस्ता खाचखळगे लागतात भासू 

मुखकमलावर ओढून आणावे लागते हसू 


उसने हसू, डोळ्यांच्या ओलावतात कडा 

गतकाळाच्या आठवणीने जीव होतो वेडा 


एक मागणे देवा, दोघांसाठी रचावे एक सरण 

हसता हसता का नाही येत एकत्र मरण 


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Abstract