STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

4  

Manisha Awekar

Abstract

शिशिरातून वसंत

शिशिरातून वसंत

1 min
474

पानगळ शिशिराची

आता सुरु झाली सये

तरु निष्पर्ण तरीही

वाट वसंताची बघे


पिकलेले पान गळे

नियमचि निसर्गाचा

नाही उपयोगी त्याला

जीवनात नको थारा


जुनी जातील गळुनी

नवी पालवी येईल

जीवनात, निसर्गात

सत्य प्रत्यया येईल


पानगळ झाली तरी

जुने सुकलेले जाई 

नव्या पर्णबहराने

झाड बहरुन येई


बहुमोल विचारांचे

धन ज्ञानही देईल

दुःख निराशा जाऊन

सुख पालवी येईल


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract