दिस सुखदुःखाचे
दिस सुखदुःखाचे
दिस येती जीवनात
आलटूनी पालटूनी
स्थिर असावे मनुजा
सुख दुःख सम मानी
दिस सुखाचे पळती
झरझर वेगेवेगे
नित्य स्तुती प्रशंसेने
मन खुशीत तरंगे
सुखापाठी दुःख येई
पाठ सर्व फिरवती
करी पारख जाणती
उसवती घट्ट नाती
सुख दुःखाचे दिवस
देती जाण मनुजाला
आप परका जाणसी
असे फसवा हा मेळा
