STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

राजा - राणी

राजा - राणी

1 min
355

भातुकलीच्या खेळामधले

नेहमीचे दोघे राजाराणी

खेळ रंगी रंगूनी रंगे

रंगत वाढवी मधुर वाणी


राज्य दोघांचे राजा राणीचे

तृप्त आनंदी नितळ मनाचे

खुसूखुसू हसण्यास असे

मित्रमंडळ भोवतालचे


खेळ गप्पा नि चेष्टा विनोद

भातुकलीचा जोर असे

दिसामागून दिस सरले

कसे भराभर नकळतसे


अचानक राजाने केले

चौर्य पलायन दूरदेशी

 राणी मनात हळहळली

असा कसा सखया जाशी?


फरार झाला परदेशी राजा

राणी मनोमनी झुरतसे

डाव अर्ध्यावरी मोडला

शल्य उरामधी डाचतसे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract