STORYMIRROR

Sarika Jinturkar

Abstract

3  

Sarika Jinturkar

Abstract

एकांत

एकांत

1 min
350

 निशब्द करणारा

 शांत असा एकांत 

श्वास जाणवावा जिथे

 जगाला विसरावे 

मनाशी हितगुज करावे

 असा एकांत... 


 शब्दात हरूनी जावे  

सांजवेळी बसावे जिथे निवांत

 वेळ मिळतो जिथे

स्वतःला आपले अस्तित्व कळते

 व्यक्त होतात कागदावर भावना 

मिळतो बेधुंद करणारा आनंद 

असा एकांत

कधी थोर माणसे एकटेपणास जिंकतात

 उगाच का..त्यांना विचारवंत म्हणतात  

राहण्यात एकटे कधी असेल का वेगळी बात..

 चंद्र,सूर्य असेच का..? विशाल नभी शोभतात ...


 न्याहाळते कधी मी माझी स्वप्न 

गहिवरते अंतरंग 

अबोल ही निशा अन् वारा शांत 

 आवडतो मज 

मग असा हा एकांत


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract