Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sarika Jinturkar

Abstract

3.9  

Sarika Jinturkar

Abstract

वेदना

वेदना

1 min
385


भाव-भावनांचा विस्कटलेला डाव वेदना  

शब्द शब्दांतील परकेपणाचा आव वेदना  


कधीकधी असाह्य होत जातात 

खंबीर मनाला तोडून टाकतात वेदना  


काही आपल्यामुळेच मिळतात 

काही चूक नसतानाही शिक्षा देतात या वेदना 


सहज दिसत नाही कुणाला तरी खूप लागतात मनाला 

खूप खोलवर पर्यंत टोचतात जीवाला या वेदना 


 जिथे फुटतो बांध भावनांचा तिथे वसतात वेदना 

जिथे असतात बोथट संवेदना तिथे नसतात वेदना  


कधी कुणाला गमावल्याची 

कधी कुणाला दुखावल्याची 

कधी साचते डोळ्यात 

अश्रूरूपी वेदना 

कधी बोचते डोळ्यात एखादी सल जशी ही वेदना


मानसिकतेचा खेळ सारा अपेक्षांचा मेळ सारा 

 वेदना शमतील एका स्मितहास्यानी

 विसरल्या जातील त्या रम्य आठवणी

  म्हणूनच दुखऱ्या जागेवर फुंकर मारा, वाहू द्या हास्याचा झरा 

शेवटी जगणे- मरणे दोन टोकातील अंतर वेदना  

हसणे -रडणे चेहऱ्यावरील मंतर वेदना 


Rate this content
Log in