थोडंसं समजून घे ना मला
थोडंसं समजून घे ना मला

1 min

652
पुष्कळदा ठरवते सांगावं तुला
पण धीरच होत नाही मला !!
मनातलं सार मनातच राहतं
ओठावर काही येत नसतं !!
थोडंसं समजून घे ना मला !!
अशी कशी मी हाक देऊ
सोपं वाटतयं का तुला !!
जगाची रीत मनातली प्रीत
सगळ्याचा विचार करायचाय मला ! !
थोडंसं समजून घे ना मला !!
म्हणूनच अपेक्षा करत राहते
तूच काहीतरी बोलण्याची !!
खरं तर मी ही वाट बघते
तू प्रतिसाद देण्याची !!
थोडंसं समजून घे ना मला !!
माझे शब्द नाही महत्वाचे
भावना तर कळल्या ना तुला ??
सगळ्याच गोष्टी सांगता येत नाही
थोडसं समजून घे ना मला !!