कोरोना
कोरोना
1 min
80
देवबाप्पा देवबाप्पा नवसाला पाव!!
कोरोनाला ह्या तू पळवून लाव !!
नको येऊ देऊ त्याला देशात माझ्या !!
रोज रोज ऐकते मी बातम्याच ताज्या!!
मधून मधून सगळयांना शिस्तही लाव !!
कोरोनाला ह्या तू पळवून लाव!!
शाळा नाही अभ्यास नाही वाटे ना बरे!!
सगळ्यांनी गाठली आपआपली घरे!!
शांत झालं माझं सगळं हे गाव !!
कोरोनाला ह्या तू पळवून लाव!!
आईजवळ करते मी नुसतीच हट्ट!!
खाऊ खाऊन होते रे नुसतीच लठ्ठ !!
खेळायला नाही मला कुठेच वाव !!
कोरोनाला ह्या तू पळवून लाव !!