STORYMIRROR

Jaymala Kulkarni

Others

3  

Jaymala Kulkarni

Others

दिलासा

दिलासा

1 min
45

निःशब्द स्पंदनांची

बोलून आज भाषा

त्या शांततेत त्रागा

मी पाहिला जरासा


मीही फकीर होतो

ऐश्वर्य हे मिळाले

गरिबीस भावलेला

राजा असाच खासा


अंधार आज आहे

माझ्या सभोवताली

देणार का रवीला

छोटा दिवा दिलासा


साहित्याला गुण द्या
लॉग इन