STORYMIRROR

Jaymala Kulkarni

Others

4  

Jaymala Kulkarni

Others

पावसा, तुझं काय बाबा....

पावसा, तुझं काय बाबा....

1 min
22.8K

आलं मनात तर बरसायचं नाही तर पाठ फिरवून जायला लागला आहेस !!

पावसा तुझं काय बाबा.....

हल्ली तूही माणसासारखं वागायला लागला आहेस !!


कधी कधी इतका कोसळतोस की कुणाला आघात होईल हे विसरायला लागला आहेस!!!

पावसा तुझं काय बाबा....

हल्ली तूही माणसासारखं वागायला लागला आहेस !!


नुसतंच झाकाळून येणं आणि निघून जाणं हाही गुण अंगी बाळगायला लागला आहेस !!

पावसा तुझं काय बाबा....

हल्ली तूही माणसासारखं वागायला लागला आहेस!!


उगाच टाकणं टाकायचं म्हणून बरसू लागला आहेस !!

पावसा तुझं काय बाबा....

हल्ली तूही माणसासारखं वागायला लागला आहेस!!


माणसं वागतात तसं तूही वागायला लागला आहेस!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन