कोरोना
कोरोना
बाहेर कोरोनाच मोठं संकट
घरात बसावं तर बायकोची कटकट !
कोणी रचला हा कोरोनाचा कट
साऱ्या जगावर भीतीच सावट!!
बंद झाले मंदिर आणि मठ
मजुरांनी बांधले रस्त्यावर तट!!
सरकार म्हणतंय करू नका गट
पोलीस म्हणतात आधी बांधा मुस्कट !!!
काय करावं कुठंच चालेना वट
मग बघतो बातम्या झटपट !!
घरात बसून देशाला वाचवायची करतो खटपट|