फक्त पावसासाठी
फक्त पावसासाठी

1 min

28
माझी आजची कविता फक्त पावसासाठी
पाऊस आल्यावर अवखळपणे बागडणाऱ्या तुझ्यातल्या बालमनासाठी
छोट्याशा पाण्याच्या डबक्यात पण तुझी कागदाची होडी कशी तरंगते आहे ह्या आनंदाच्या नजरेसाठी !!
माझी आजची कविता फक्त पावसासाठी
आता पाऊस बरसणार आणि तत्क्षणी तो येणार ह्या आतुरतेसाठी
त्याचं येणं आणि पावसाचं बरसण ह्या गंधाळलेल्या भेटीसाठी!!
माझी आजची कविता फक्त पावसासाठी
गरमागरम कांदाभजी आणि आल्याच्या चहासाठी
श्रावणातील त्या सरी आणि गप्पागोष्टींसाठी !!!
माझी आजची कविता फक्त पावसासाठी!!