व्यथा
व्यथा
1 min
48
लॉकडाउन झालं,
नवरे म्हणतात घरात बसून करायच काय?
झाली आमची दशा!
काउंटडाऊन सुरू होते तिचे
सकाळपासून बायका राहतात कशा?
तुमच्या हातात रिमोट आणि मोबाईल फोन,
डोक्याखाली उश्या!
ती मात्र उठते सकाळी सकाळी
हाती देते कप बश्या!
कधी तरी विचारा ना तिला
घरात राहून
तुम्ही कंटाळत नाही कशा?
महिन्यातला एक दिवस द्या,
आणि म्हणा जगा हवं तशा!