बस एक शब्द
बस एक शब्द

1 min

34
मनाच्या त्या कोपऱ्यात एक स्तब्ध आक्रोश होता,
मला बोलायचा तेव्हा बस एक शब्द होता!!
उतराई आठवांची अन सोबतीस समईचा प्रकाश मंद होता,
मला बोलायचा तेव्हा बस एक शब्द होता !!
बंधारा संयमाचा निपचित घातला होता,
ओघळून तेव्हा एक अश्रूही वाहिला होता !!
बोलायचा तेव्हाही एक शब्द राहिला होता!!
उत्तरे अनेक ज्याची प्रश्न फक्त एक होता,
मनाचा तो कोपरा अजून उदास होता !!
बोलायचा तेंव्हा बस एक शब्द होता ! !