STORYMIRROR

Jaymala Kulkarni

Others

4  

Jaymala Kulkarni

Others

लाॅकडाऊन

लाॅकडाऊन

1 min
18

आकाशातील एक पक्षी आज माझ्याशी बोलून गेला !!!

बघून माझी अवस्था 

थोडं मला हीणवून गेला !!!

त्याला म्हणलं ,

 काय सांगू बाबा तुला !!

आज माणूस लॉकडाउन झाला !!

पक्षी म्हणाला ,

अरे माणसाने जरा अतिरेकच केला !!

नको तितकं उडत राहिला !!!

विसरून गेला घरट्याला !!

बस आता तरी घरट्यात 

आणि दाणा भरवं पिल्लाला !!

आव्हान आहेत तुझ्या समोर तरी वेळ दे स्वतःला !!

जीवन आवश्यक गोष्टी किती ??तितकंच कमवं पैश्याला !!

पक्षी मला सांगून भुर्रकन असा उडून गेला!! 

खिडकीच्या पिंजऱ्यातून पहात राहिले मी त्या पक्ष्याला!!


Rate this content
Log in