STORYMIRROR

Jaymala Kulkarni

Tragedy Others

3  

Jaymala Kulkarni

Tragedy Others

कहाणी

कहाणी

1 min
30

ओळखलंत का देवा मला देवळात आला कोणी,

मन होते व्याकुळलेले, डोळ्यामध्ये पाणी

क्षणभर बसतो, नंतर सांगतो माणसाची कर्मकहाणी!!!

कोरोना व्हायरस पाहुणा आला गेला घरट्यात कोंडुनी!!

माहेरवाशीण पोरीसारसारखा चार भिंतीत नाचलो,

मोकळ्या हाती राहू कसा?? आवक नाही, खचलो!

पुणे बंद, मुंबई बंद, सारे जग बंद झाले!! 

प्रसाद म्हणून भारतामध्ये परदेशी हे आले!!

कारभारणीला घेऊन संगे घाबरून घरात बसतो आहे!!

हात सारखे धुतो आहे, मास्क नाकाला लावतो आहे!!

वरदान म्हणून पैसे देता शरमेने उठलो,

पैसे नको देवा फक्त आरोग्य दे मजला!!!

कोरोनाची लागण नको आता जगाला

डोक्यावरती हात ठेवुनी सांग गेला कोरोना!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy