तुझ्यासोबत वावरताना
तुझ्यासोबत वावरताना
शब्द ओठावर
दवबिंदू जसे-
या शब्दांवर
बंधनांचे ओझे,
तूजवीण जीवन
स्तब्ध जहाले माझे!
व्यक्त करावयास
काटे घड्याळ्याचे-
माझ्या प्रीतीत
गुंतलीस तू
सावल्यांचा खेळात
गुंफुतात धागे !
परिभाषा प्रीतीची
करतेस तू-
हसत हसत
वाऱ्यावर बांधिले,
नशील्या नयनांतुनी
प्रेम तुझे ते साधे.
विणलेला मोगरा
तुझा तो गजरा-
साधली कशी ही
गुंतागुंत.
जाळ्यांच्या बंधनातून
धूरात नहावे.
थांब थोडा
म्हणतेस तू-
शब्द जरी सुने
वाट का पहावी
मर्म प्रतिक्षेचा
आसमंतात शोधावे.
किती किती
निष्फळ खोटे-
स्पर्शाच्या शस्त्रांना
तिमिरात लोचनी,
घेऊनिया धावतेस
फसवे बहाणे?
अस्तित्व तुझे
माझ्या भोवताली-
बंधन स्वप्नांचे
घेऊनिया जगावे
लोचनात, ओठावर
शब्द मात्र , अधुरे आधे!
