स्वप्नातील गीत
स्वप्नातील गीत
1 min
69
मेघ नभी घनिवाळू
बरसती झिळूमिळू
गीत माझ्या स्वप्नातील
झिरपते हळूहळू
रंग लेउनी श्यामल
वाजितो मल्हार सुरेल
नादावूनि ती निळाई
भुईवरी झेपावेल
हर्ष भारी गगनाला
टपकती मौक्तिकमाला
श्वेत धार झिरमिळ
पैलतीरी सरितेला
मुक्त वाहता अंबर
चराचरी घुमे ओंकार
हुंकारीता ते जीवन
रोमरोमी येई झंकार
सारे सारे अणुरेणू
लागती गीत गुणगुणू
साऱ्या ब्रह्माण्डी घुमे
एकच नाद जणू