एकदा माझ्या स्वप्नात माहितीये आला होता बाप्पा...
एकदा माझ्या स्वप्नात माहितीये आला होता बाप्पा...
एकदा माझ्या स्वप्नात माहितीये आला होता बाप्पा...
मी गेलो होतो मंदिरात म्हणला चल मारू थोड्या गप्पा...
बोलला काय हवं बाळा तूला खाऊ हवा की खेळणी.. ??
उगा सहजच भेटायला मला कुठं येतं कुणी.. ??
कुणाला हवी गाडी तर कुणाला हवा बंगला.. !!
कुणाला हवे भरपूर पैसे तर कुणाला जाॅब चांगला..!!
इथे येणाऱ्या प्रत्येकाची ही मोठी यादी..
सर्वांची गाऱ्हाणी ऐकणे ही काही गोष्ट नाही साधी..!!
चोवीस तास ड्युटी करून खरं सांगू मी आता कंटाळलोय...
सारखाच ओव्हरटाईम करून बाळा पुरता थकून गेलोय..
एक मागणी पुरवता लगेच असते दुसरी माग
णी तयार..!
कळतच नाही हा माणूस कधी समाधानी रहायला शिकणार??
बाळा तुला एक सांगेन जीवन स्पर्धा अथवा रेस नाही..
शेवटच्या क्षणी खेद करून सांग उपयोग आहे का काही??
सोन्या एक गोष्ट माझी अगदी लक्षात ठेव नीट..
छोट्या छोट्या गोष्टीत तू आनंद मिळवायला शीक...
अपयश आले कधी तर खचून जाऊ नकोस...
संकटात कधी स्वतः ला एकटे समजू नकोस...
जेव्हा फसशील संकटात नि मारशील मला हाक..
धावूनी येईल तुझ्यासाठी हा विश्वास मनी राख..
चल बाळा निघतो आता पूरे झाल्या गप्पा..
एकदा माझ्या स्वप्नात माहितीये आला होता बाप्पा..!!