STORYMIRROR

Shubham Kadam

Abstract Fantasy

3  

Shubham Kadam

Abstract Fantasy

तू मोगऱ्याची कळी

तू मोगऱ्याची कळी

1 min
594

करी तिमिराचा नाश, प्रभेची तूच आस

आरंभ असो वा अंत, सारे तुझ्यातच प्रवास

तू असे जिथे, अनुरागाचा तिथे सुगंध दरवळी

अंगणात माझ्या गं पोरी, तू मोगऱ्याची कळी ।


यौवनाची कांचन कांती, शमवी त्या भास्करा

मिळवाया कुंभ पियुषाचा, मंथनाचा खेळ सारा

लढताना ती रंजित लढाई, काहूर माजेल मनी तरी

त्राण आपटून गं किशोरी, घे सागर लाटांपरी उसळी ।


शोभे नभी शशी पुनवेच्या निशी, नसे नभी तो, रात ती मग अवसेची?

अस्तित्व तिचं बांधलयं आम्ही फक्त जोडीदारापाशी

त्यागाचं प्रतीक संबोधून जरी समाज तिला छळी

अखंड ऊर्जा ज्योतीची, गं नारी, तू मंगल काजळी ।


आसक्त गंगा अंतराळी, घेई ठाव भूमिपात्राचा

अद्वैत असा तो क्षण, चेतना विरह नी मिलनाचा 

निघशील जरी तू खूप दूरच्या प्रवासाला या वेळी

वसशील आठव बनून तू गं रमणी, त्या पिंपळ पर्ण जाळी ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract