एक भेट....
एक भेट....


ती आली अशी झुळूक कस्तुरीपर,
मन वेडेपिसे करुनिया गेली,
जरी होता वार तो अकस्मात,
घायाळ मी,हसतमुख होतो तरी।
होते वर्ष शेवटचे,मिश्र साऱ्या भावना,
गॅदरींगचा तो दिवस,घालमेल काही राहवेना,
आलो मी बाहेर ,करुनी कला आपली सादर,
होती तिथेच ती,पांघराया आपल्या भुरळीची चादर।
गाफील होतो मी,आली ती पाठीमागून,
केलं अभिनंदन माझं, हातामध्ये हात घालून,
तिला पाहताच, विचारचक्र माझे थांबले होते,
अप्सरेला जवळून इतक्या,कधीच मी पाहिले नव्हते।
काय होतं तिच्यात एवढं खास?,विचार कधी केला नाही,
तिचे एक एक हावभाव काळजात घर करुनी जाई,
बोलका तो चेहरा तिचा, त्यावर ते गोड हसू राही,
शुद्ध,निष्पाप त्या ऊर्जेचा ,मोह लागेल कुणालाही।
पुढे काय बोललो आम्ही ,नाही आता ध्यानी,
पहिल्या नजरेतलं प्रेम हेच,विचार पक्का केला मनी,
होतो इतकी वर्षे आपण एकमेकांच्या सभोवताली,
मग का गं आयुष्यात माझ्या,एवढ्या उशिराने तू आली?।
विचार केला,काळाचं चक्र उलट्या दिशेने फिरवून पाहावं,
तुझं आणि माझं नातं वेगळ्याने सुरू करून पाहावं,
एक भेट अजून व्हावी,म्हणून हा मनाचा खटाटोप,
काळीज अजूनही पिळवटते,आठवून तो शेवटचा निरोप।
तुझी एक झलक पाहाया,जीव कासावीस होतो अजूनही,
एका भेटीतच एवढी ओढ ,लावतं का गं कुणी?
तुला मॅसेज करून बोलावं,हिम्मत माझी होत नाही,
ओळखशील का गं मला?,ही भीती काही जात नाही।
परत भेट होईल तेव्हा,तेच हसू चेहऱ्यावर ठेवशील ना?
वेडेपणा पाहून माझा,माझ्या मनातलं हेरशील ना?
वाट पाहतो समुद्र जसा नदीची,तशी मीसुद्धा वाट पाहील,
आणि तोवर फक्त याच ओळी गुणगुणत राहील,
ती आली अशी झुळूक कस्तुरीपर,
मन वेडेपिसे करुनिया गेली,
जरी होता वार तो अकस्मात,
घायाळ मी,हसतमुख होतो तरी।