रंग बावरा श्रावण
रंग बावरा श्रावण


रिमझिम रिमझिम श्रावणात या,
चिंब भिजून सोबत राहावे।
विसरुन सारे देहभान मी,
स्पंदनात रोमांच असावे॥
अंतर मिटूनी श्वासातील हे,
अंगावर शहारे फुलावे।
नजरेस तुझ्या मी हेरुन घेऊन,
काळीज माझे घायाळ करावे॥
शरीरावर कोवळी ऊन ही,
अल्लड वारा स्पर्शुनी जावे।
पाने फुले बहरुन येऊनी,
इंद्रधनुचे रंग खुलावे॥
आला श्रावण रंग बावरा,
सांगे सर्वाना ही ढिंढोरा।
पावसाच्या सरीत त्याच्या,
मोर नाचतो फुलुन पिसारा॥
श्रावणाच्या पावसाने कमाल केली,
धो धो कोसळून धमाल केली।
उसंत न घेता क्षणभराचीही,
सर्वाना चिंब भिजून गेली॥