Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

MAHENDRA SONEWANE

Others

4  

MAHENDRA SONEWANE

Others

उनाड वारा

उनाड वारा

1 min
274

सों सों करुन वाहतो

उनाड वारा वादळाचा ।

मन विचार करीते

ठाव घेण्या आयुष्याचा ।।

   वारा उनाड हा आहे

   फिरे भोवती गरागरा ।

   मनाचे उडती पाखरु

   झेप घेतसे अंबरा ।।

उनाड वाऱ्याला काय सांगू

नाही कश्याचे त्याला बंधन ।

क्षणात येऊन तो जातो

त्याला सारेच आहे नंदनवन ।।

   वाऱ्याचा तो उल्हास

   काळजाला ही भिडतो ।

   झुळझुळ वाहून तो

   मनी गारवाही देतो ।।

वारा आहे खोडकर

देतो उत्साह जरासा ।

तरी मनाला भावतो

त्याचा स्पर्श हवाहवासा ।।

Rate this content
Log in