STORYMIRROR

MAHENDRA SONEWANE

Inspirational

3  

MAHENDRA SONEWANE

Inspirational

वाट

वाट

1 min
283

आयुष्याच्या वाटेवरी, 

स्पर्श तुझा समजावा। 

आहे नाते तुझे माझे,

त्यात गोडवा असावा॥ 


नसे भेद कोणताही,

भोगू संगतीने सुख।

येता कठिण प्रसंग,

तरी नका ठेवू दुःख॥ 


आहे साथ तुझी मला,

वाट नाही चुकायची।

जुन्या आठवणी तुझ्या,

साथ नाही सोडायची॥ 


होती वाट गावातली,

जिथे बालपण होते।

तुझे माझे सारे भेद,

तिथे नष्ट होत होते॥ 


वाट जीवनाची छान,

जाते कशी घाटातूनी।

दिसे छान वृक्षवेली,

खुशी होते मनातूनी॥ 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational