STORYMIRROR

कवी : गणेश पवार

Inspirational

3  

कवी : गणेश पवार

Inspirational

।।गुरू।।

।।गुरू।।

1 min
74

झाला जीवनाचा प्रवास सुरु

माता पिता माझे आद्य गुरू

केले शिक्षण ज्यांच्या मूळे

शिक्षक शिक्षिका माझे गुरू ....


बालपण ,तरुण पण

मग येईल म्हातारपण

तरीही अजून शिकतच आहे

शिष्य होऊन पूजतो गुरुचरण ....


खेळ, नोकरी, व्यवसाय व्यापार 

यांत परिस्थितीने जे शिकवले

आले आणि गेले किती सुख दुःख

ते कोणी नाही टिकवले ....


नंतर झाला संसार सुरू

तेथून पुन्हा प्रपंच करू

मुले बाळे गणगोत धरू

अशी आहे गोष्ट गुरू ....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational