।।कर्तव्य।।
।।कर्तव्य।।


कर कर्तव्य तू आधी
मागे कधी हटू नको
आलेत कितीही संकटे
त्यांना पाहून घाबरू नको...
आई-वडिलांची सेवा
हे तर आद्य कर्तव्य
गुरुजनांचा मान ठेव
ज्ञान दिलेत त्यांनी दिव्य...
करावा मित्रांसोबत
शत्रूचाही सन्मान
त्यांच्यामुळेच तर आहे
समाजात प्रगतीचा मान...
देशसेवा करावी निरंतर
गोर-गरीब अंध-अपंग
बंधूंना दे हात मदतीचा
मानवधर्मात राहुनी दंग...