।।प्रेम।।
।।प्रेम।।
प्रेम म्हणजे आहे काय
कोणी मजला सांगेन काय
प्रेम म्हणजे आपले बाप नि माय
ज्यांनी दाखविली आपल्याला दुनिया म्हणजे काय
जेथे नभ पकडतात धरणी माते चे पाय
अशी जागा सापडते का पहाय
प्रेम म्हणजे आहे काय
कोणी मजला सांगेन काय
प्रेम म्हणजे नाही दुधावरची साय
एक मेकविषयीची आपुलकी हाय
अमिरी गरिबी नसते इथे हाय फाय
यांत असतो जाती धर्माला बाय बाय
प्रेम म्हणजे आहे काय
कोणी मजला सांगेन काय
प्रेम म्हणजे डोळ्यातील आसू हाय
प्रेम म्हणजे ओठातील हसू हाय
प्रेम म्हणजे मनातील भावना हाय
प्रेम म्हणजे हृदयातील स्पंदने हाय
प्रेम कोणावरही करता येते
ते कोठेही केंव्हाही कधीही करता येते
अनुभव एखादा घेऊन पहा
प्रेम एकदा करून पहा