।।जय हिंद।।
।।जय हिंद।।
किती जगावे
किती मरावे
देशासाठीच
जीवन वहावे ...
अभिमान असावा
स्वाभिमान नसावा
भारत भूमीसाठी
शेवटचा श्वास उरावा ...
जय हिंद चा नारा
ऊर भरून देतांना
आनंदाने डोळे भरून
तिरंगा पहावा फडकतांना ...
वंदन करीतो भु मातेला
जोडतो मी दोन हातांना
हसत मुख राहावे
माझे प्राण जातांना ...