।।गुलाब।।
।।गुलाब।।
फुलांचा राजा गुलाब माझा
सुगंधाने बहरला फुलांचा बगीचा
असले जरी काटे सभोवती
हसून मोहक दिसतो डोईवरती
कधी देवाच्या चरणी
तर कधी प्रियसी च्या हाती
असतो हा घराच्या अवती भवती
मनमोहून टाकतो सगळ्या संगती
रंग याचे असले जरी अनेक
सुगंध त्याचा आहे एक
तरुण तरुणी अबाल वृद्ध
होतात याच्या सुगंधाने तृप्त
