STORYMIRROR

Bhavesh Lokhande

Abstract

3  

Bhavesh Lokhande

Abstract

सुखानेही...

सुखानेही...

1 min
24

सुखानेही दु:खाला कधीतरी कवटाळावे

कधीतरी दु:खाचेही असे पांग फेडावे


अंतरातले कढ राहू द्यावेत अंतरी

अंतरे जन्मांची सोडावीत अधांतरी

उंबरीचे आपल्याच माप ओलांडावे


कोरड्या अश्रूंनाही मग द्यावी रजा

जन्माचीच आहे जर जन्माची सजा

भिंतीवरून डोकावून जग जरा पहावे


आठवणींचा स्वभाव जरी असला लहरी

शांत त्यांस बसवावे कधी एखाद प्रहरी

अनोळखी काही मिळते का ते पहावे


दु:खाला घेऊन सुख कधीतरी निघेल

काठोकाठ भरूनही तेव्हा काही न उरेल

तस्वीरीस मग आपल्याच हारफूल वहावे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract