तहानलेले घर माझे
तहानलेले घर माझे


तहानलेले घर माझे
तुझ्या बरोबरल्या पावसासाठी
काहूर वेदनांचे घेऊन येते प्रत्येक ऊन,
मी गोतावळ्यात निर्जिवांच्या
हृदयाचे ठोके मोजत बसतो
अन सुसाट वारा पश्चिमेचा
माझे घर शहारून टाकतो...
मी वेडा, उगाच छंदी
फांद्यापानांत लपलेले क्षण शोधतो,
क्षण चार ओळखीचे
चार अनोळखी वेचून ठेवतो
कुपींच्या कुपी अत्तराचे फाये
आकाश पसरवतो,
मंद गारेगार झुळूकीबरोबर,
अन मी कसाबसा हसतो
सुगंधाची किंमत द्यावी लागेल म्हणून