घर
घर


घराला घराचा आपला एक वास येतो
घरी आल्यावर ओळखीचा आवाज येतो
आनंद दुःख कुतूहल असो वा नाराजी
माझ्याच वागण्याचा मला अदमास येतो
श्वास घेते माझे घर उराउरी भेटते
घरी येतो मी नि भिंतीतून निःश्वास येतो
दाराला टेकतो मी नि घर पाहून घेतो
महिन्याकाठी नेहमी माझा प्रवास येतो
झोपते घर माझे मी होतो गलितगात्र
भिंतींशी बोलताना का तुझा सुवास येतो ?