संमोह
संमोह


हि पावसाळी कातरवेळ
हा तुझ्या डोळ्यांचा डोह
विरहाचा आजन्म करार
तरीपुन्हा का होतो तुझा मोह
शहरे बदलतोय सारी तरी
सुटेना तुझ्या आठवांचा संमोह
हा सुना सुना भवताल सये
हि सुनी सराई सुना सभोव
सुर ओळखीचा घुमे मनी
कोण आळवताहे नवा आरोह
निजती तुझ्या पायाशी डोळे
हा माझा श्वास मंद सखोल
तरंगे माझ्या मनाभोवती जणू
डोहात पोहे ती एकटी मासोळ
तू घ्यायचीस फुले दुर्वा कळ्या
ते एकुलते दुकान माझ्या समोर
धरणाखाली गेले काल शेत माझे
राहिले गाव आज एकटे अबोल
रोज कुठे सोहळा अन पंगत
आज पुनः शिळी भाकरी चतकोर
रंग तिचा मला घेता येत नाही
तिच्या कुशीत नाचे रोजच मोर
हि पावसाळी कातरवेळ
हा तुझ्या डोळ्यांचा डोह-