शीर्षक वसुंधरामाता
शीर्षक वसुंधरामाता
वर्षेतली वसुंधरा
वस्त्रे हरित लेऊनी
अलंकार फळे फुले
दिसे ती लावण्यखणी (1)
सुंदरशा वसुधेला
कुणी दुष्ट दृष्ट लावी
टाके प्लँस्टिक कचरा
-हास पर्यावरणासी (2)
सर्वजण लावू झाडे
जाणा कर्तव्य आपुले
राखू स्वच्छ परिसर
फुलवूया राने वने (3)
मिळे हवा स्वच्छ शुद्ध
दिसे परिसर छान
फळे फुले नटलेली
देई वसुंधरा दान (4)
वसुंधरा जाणा माता
स्वच्छ सुंदर सजवू
पूज्य वसुंधरामाता
आजन्मचि ऋणी राहू (5)