रात्र साद देत होती...
रात्र साद देत होती...


धुके दाटल्या अंधारी, ही रात्र साद देत होती...
कौल कुणापरी तिचा, संवाद माझ्याशी साधत होती...!!
सामावून घेते आजच, मी दैन्य अवघ्या जगताचे...
दारिद्र्य नष्ट करावयास, अशी ती धडपडत होती...!!
कायमचा गिळण्यास हा, कठोर दुर्विचार या जगताचा...
अज्ञानाचा डाव संपविण्या, अधीर ती चाचपडत होती...!!
वध करावयास राक्षसाचा, जो हिंसेची रूपं गाजवितो...
अंतर्बाह्य मानव हानी, टाळण्यासाठी ती झुरत होती...!!
थांबून तिने मग चिंतले, विळखा कसा मोडावा भ्रष्टाचाराचा...
अप्रामाणिकता ही दूर व्हावी, द्वि-नीति ती रचत होती...!!
म्हणाली येतेच काळरात्र बनून, नेण्या परतीला अंधःकार...
प्रकाशमान निर्मळ अवनीचे, सुवर्ण स्वप्न ती बोलत होती...!!
धुके दाटल्या अंधारी, ही रात्र साद देत होती...
ठाम असे विचार मांडत, वेध मनाचा घेत होती...!!