तू अशी कशी गं ताई
तू अशी कशी गं ताई


लहानपणापासून पाहतो आहे तुला
तुझे खरे स्वरूप कोणते?
हे लागला वेळ समजायला
परखड बोलणे तुझे
करी सुरूवात वादाला
पण सांगू खर..
यातूनच झाली सुरवात आपल्या नात्याला
तुझे स्वरुप काय आहे
नाही उमगले अजून मला
सांगतो खरचं ...
कदाचित यानेच असावी झाली सुरवात
आपल्यातील प्रेमाला
असायची पूर्वी तू खुप अशांत
दोघांत व्हायचे वाद तरी होतीस माझ्या मनात
आज संपला वाद दोघांतला
तरी तुझा रडका चेहरा
सतत आठवतो मला
चुगली करण्याची सवय नाही गेली तुझी अजून
पण त्यातही वाटते मज्जा मला मनापासून
इतके दिवस झाले आपल्या दोघांच्या नात्याला
तरीही कळले कसे नाही मला
तुझी सोबत आहे फक्त तुझ्या भावाला
केव्हाही संकटात नेहमी तुझाच चेहरा मी आठवी
आणि स्वतालाच प्रश्न मी करी
कि,तू अशी कशी गं ताई ?