STORYMIRROR

Nandini Menjoge

Abstract Others

3  

Nandini Menjoge

Abstract Others

आठवणी

आठवणी

1 min
79


गुंतागुंत या जगाची 

गुंफलेल्या जीवांची, 

एक क्षण सहज हसला 

क्षणांत घर करून बसला!!!


माणसांच्या गडद गर्दीत 

धुंद मस्ती जगात, 

विचार सहज मुखी हसला

पडद्याआड काळ गाठला!!!


अवघडलेल्या जीवनशैलीत 

व्यस्त वेळेच्या काट्यांत, 

मनःपटलावर भावनांचा खेळ रंगला 

अवकाशी या अव्यक्त चेहरा नटला!!!


विसरून जावी साद ती नाती कसली..?? 

अंतराचे बंधन पाळावी ती बंधने कसली..?? 

रक्ताच्या पलीकडे जो ठेवा अमोल अश्रूंचा 

अंतरीच्या गाभारी दाटतो हळवा कप्पा

आठवणींचा!!

आठवणींचा!!


Rate this content
Log in