MAHENDRA SONEWANE

Abstract Inspirational


3  

MAHENDRA SONEWANE

Abstract Inspirational


क्षितिज

क्षितिज

1 min 5 1 min 5

मनात येते मीही क्षितिजावर जावे।

अलगद जाऊन क्षितिजाला स्पर्श करावे।।

काय असेल हे त्याच्या पुढे पाहावे।

आकाशाशी जवळ जाऊन गट्टी करावे।।१।।


जे नजरेत भासते त्याचा अनुभव करावे।

क्षितिजाच्या रंगछटेला न्याहाळून यावे।।

दिनकराच्या मावळतीचे रंग उधळावे।

सायंकालच्या सौंदर्याचे दर्शन घ्यावे।।२।।


धरेची नभाला मिळण्याची प्रीत अनोखी।

किती जन्मीची भेट झाली हे पाहून वाटे।।

त्यांच्या नात्यातील अंतर हे त्यांचे वास्तव।

मिलनाची भुरळ पृथ्वीची त्यांना पाहून वाटे।।३।।


निसर्गाचे नंदनवन आपल्या सर्वत्र आहे।

आपल्या भोवती रंगाचे इंद्रधनुष्य आहे।।

किनाऱ्यावर उभे राहून पाहाव्या सुंदर लाटा।

वेचून घ्यावा प्रकाश कण रोखलेली नजर पाहे।।४।।


सांज ढळत्या वेळी लोपली सुर्याची लाली।

माघारी परत येताना ओढ घराची लागली।।

मनात विचार आले ही सांज विचारु लागली।

लोप होई विचारांचा रात्र भयाण आली।।५।।


Rate this content
Log in

More marathi poem from MAHENDRA SONEWANE

Similar marathi poem from Abstract