STORYMIRROR

MAHENDRA SONEWANE

Inspirational

3  

MAHENDRA SONEWANE

Inspirational

माणसा माणसा जागा हो

माणसा माणसा जागा हो

1 min
714

माणसा माणसा जागा हो,

माणुसकीचा धागा हो।

समाजात समतेने वाग जरा,

शांतीचा तू दूत हो।।


कित्येकांनी समाजात केला,

अनेक प्रकारचा घातपात।

अनेकांची झोप उडाली,

याच्यात आहे कुणाचा हात।।


सर्वाचे वैर सोडून सारे,

जीवनचक्र करु सुरु।

प्रगतीशील करु राष्ट्र हा,

नव्याने आपण सुरुवात करु।।


माणसास तू जोड असारे,

धर्म कर्म या बाबी तोडून।

सर्वावर तू प्रेम कर असा,

अमिरी गरीबीला सोडून।।


दु:खिताचे अश्रु पुसूया,

त्यांनाही स्वप्न पाहु द्या हो।

देशाचा तू अन् देश तुझा,

माणसा माणसा जागा हो।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational