Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

MAHENDRA SONEWANE

Romance Inspirational

3  

MAHENDRA SONEWANE

Romance Inspirational

राहिले ते स्वप्न अधूरे

राहिले ते स्वप्न अधूरे

1 min
348

सोबत शिकत होती माझ्या,

चाळे ही ती करीत होती । 

सुख दुःखात नेहमी माझ्या , 

मला एकटं सोडत नव्हती ॥ 

   तिच्या सहवासात लाभे , 

   तिचे नाते सुगंधाचे । 

   कधिही भेटती पुन्हा नव्याने , 

   आठवून क्षण सारे आयुष्याचे ॥ 

सुख होते तिच्या सोबत , 

कसलेही नव्हते अंतर । 

जीवनात आस होती , 

पुन्हा कधी भेटेल नंतर ॥ 

   मला जगणं शिकवून तिने , 

   आशा जागविली मनात माझी । 

   आता फक्त एकच आशा , 

   डोळयाला फक्त वाट तीची ॥ 

राहिले ते स्वप्न अधुरे , 

नाते नकळत तुटले । 

आठवणींच्या पाऊलखूणा , 

माझ्या जीवनात मला भेटले ॥ 

   तिच्याविना सारे क्षण माझे , 

   सुने सुने वाटत होते । 

   रंगून तिच्या रंगात सारे , 

   जीवन उधडून जात होते ॥ 

Rate this content
Log in