MAHENDRA SONEWANE

Romance

3  

MAHENDRA SONEWANE

Romance

तुला पाहतांना

तुला पाहतांना

1 min
311


तुला पाहतांना माझे

मन प्रसन्न होते ।

माझ्या मनातील क्षीण

बाहेर निघून जाते ।।


    तुझा निरागस चेहरा

    खुब काही सांगत असतो ।

    तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद

    मला समाधान देत असतो ।।


हरवते भान माझे

तुझ्याकडे पाहतांना ।

स्वतःला विसरतो मी

तुझ्या सोबत असतांना ।।


    दिसला नाही तू तर

    विचलित होते मन ।

    तुला मी शोधतांना 

    विसरतो स्वतःचे क्षण ।।


पाहतो अनेक वेळा

तुला खुदकन हसतांना ।

दर्शन साऱ्या विश्वाचे होते

फक्त तुला पाहतांना ।।


Rate this content
Log in