MAHENDRA SONEWANE

Inspirational

4  

MAHENDRA SONEWANE

Inspirational

गौरव मराठीचा

गौरव मराठीचा

1 min
436


मराठी भाषा गौरव दिन , 

आहे याचा मला अभिमान । 

कुसुमाग्रजांच्या जन्म दिनी , 

आठवतो मी मराठीचा मान ॥ 


धर्म पंथाच्या बाहेर राहून , 

मराठी आमच्या मनात आहे । 

लहान मोठयांच्या संवादातही , 

मराठी आपल्या घरात आहे ॥ 


मला छंद आहे मराठीचा , 

बाणा आहे मला त्याचा । 

मनी रोज मोहवित असे , 

विचार माझा मराठी मनाचा ॥ 


लोक मराठीला प्रेम करीत , 

बघता बघता काय झालं । 

महाराष्ट्राची गरीमा वाढवित , 

अख्या जगावर राज्य केलं ॥ 


मैत्री करुन मी मराठीशी , 

मिळविला मोठा मान । 

मला समाजात बोलवितात , 

करुन मराठीचा सन्मान ॥ 


संत ज्ञानेश्वर तुकोबांनी , 

थोरवी मराठीची गौरविली । 

बहुरसाळ मधाळ ही भाषा , 

आहे माझी मराठी माऊली ॥ 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational