भोंदूबाबा
भोंदूबाबा

1 min

245
भोंदू बाबा करी । भावनांशी खेळ ।।
लागे नाही मेळ । अंधश्रध्दा ॥ १ ॥
ढोंगी राहतात । ते देव बनून ।।
स्वतः घे ओढून । परआत्मा ॥ २ ॥
असे मोह माया । अशांत हैवान ।।
ठेवूनी गहान । बुध्दी सारी ।। ३ ।।
हरवत आहे । मानवाचे तत्त्व ॥
भोंदूचे देवत्त्व । खोटे आहे ।। ४ ।।
निराश लोकचं । बाबांच्या जाळयात ॥
शांतीच्या शोधात । निघतात ॥५ ॥
दिसू लागताच । टेकवत माथा ॥
विसरली गाथा । तुकाराम ।। ६ ।।
टाळा संमोहन । जिवंत ठेवावं ॥
डोळयांनी वाचावं । सुविचार ।।७।।