आज तिरंग्यात पावन झालो मी
आज तिरंग्यात पावन झालो मी


उत्सव आज तीन रंगाचा ,
आहे आभाळात सजला ।
वंदन करीतो त्या सर्वाना ,
ज्यांनी भारत देश घडविला ॥
स्वातंत्र विरांच्या त्यागाने ,
हा देश महान बनला ।
रंग , रूप , वेश , भाषा ,
सर्वानी मिळून एक झाला ॥
सहिष्णूता आणि स्वातंत्र्यता ,
आहे पाया महान राष्ट्राचा ।
भारत भूमीच्या पराक्रमाला ,
सूर्य चमकतो प्रगतीचा ॥
आज तिरंग्यात पावन झालो ,
ना जगावे धर्माच्या नावावर ।
माणुसकीचा धर्म या मातीचा ,
बस जगा भारत भूमीच्या नावावर ।।
मुक्त आमचे आकाश सारे ,
राने वने हिरवी झुलती ।
आनंद आज उरी नांदे ,
नभात पक्षी ही स्वैर उडती ॥