मी कवयित्री झाले
मी कवयित्री झाले


हृदयाच्या कोंदणात
विचारांची झाली गर्दी
कासावीस मन होता
शब्द काव्य देई वर्दी
होती लेखनाची हौस
वाचण्यात असे दंग
सख्या भेटल्या मजला
सांगे भर काव्य रंग
कसे लिहावे कळेना
मना स्वस्थता मिळेना
तगमग जीव होई
काय करावे कळेना
धैर्य एकवटून मी
घेई हातात लेखणी
शब्द विचारांचा मेळ
केली कविता देखणी
काव्य स्त्रीभ्रृण हत्याचे
प्रथमता साकारले
खूप प्रतिसाद आला
मन माझे मोहरले
अवचित मिळे मज
मिळे कवयित्री मान
मनी उमलून फुले
आवडले काव्य छान