तृतीयपंथी
तृतीयपंथी
तृतीय पंथी तृतीय पंथी
ऐकून सुन्न झाल्या कानांचा ग्रंथी
या समाजाची विचित्र प्रथा
किन्नरांचा जीवनाची काय सांगू व्यथा
पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग
लिंग भेदाची ही विडंबना
तुच्छ लेखून हीन मानुन
समाजाचे लोक मारतात टोमणा
टिकली लिपस्टिक लावून
हातात बांगड्या घालून
रंगीबिरंगी साड्या नेसून
पैसे मागतो लोकांकडून
नाही शिक्षणाचा अधिकार
पोट भरण्यासाठी रेल्वेवर
सिग्नल बस रस्त्यावर
पैसे मागतो हा किन्नर
शुभकार्यात आम्हाला मान
आमचे आशीर्वाद मौल्यवान
घाबरून लोक शिव्याशापांना
देतात मौल्यवान नजराणा
केली देवाने आमच्यासोबत थट्टा
लागला नशिबी बट्टा
हीनवतात लोक म्हणून हिजडा
समाज आमचा वेगळा
मेल्यावरची अंत्यविधी
आहे अगदी निराळी
मृतदेहाला लाथा मारून
स्मशानात नेतात रात्री
पुरवून जमिनीत करतात
प्रार्थना येऊ नको या जन्मात
करतो एक याचना वागणुकीत आणा समानता