STORYMIRROR

Kshitija Bapat

Crime

3  

Kshitija Bapat

Crime

मंथरा दासी

मंथरा दासी

1 min
154

रामायण काळातील

कुटिलता पूर्णपात्र

दासी कुबडी कुरूप

होती मंथरा ती मात्र


राजा दशरथ त्याला

तीन राण्या पहिली ती

राणी कौशल्या सुमित्रा

आणि कैकेयी ती होती


तिची दासी मंथरा ही

लग्नानंतर तिचाच

घरी राहायला आली

राम वनवासा तीच


कारणीभूत ठरली

तिने कैकेयीचे कान

रामा विरुद्ध भरले

केले कारस्थान


तीन वर मागुन घे

कैकेयीला सांगितले 

राम यांना वनवास

राजा भरत ते झाले


राम वनवासाला ती

मुख्य कारण ठरली

दासी मंथरा जगात

खलनायिका ती झाली



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Crime